पंजाब डख – हवामान अंदाज

महाराष्ट्रतील परभणी जिल्ह्यामधील सेलू तालुक्यामधील गुगळीं धामणगाव या गावात राहणारे पंजाबराव डख हे त्यांच्या अचूक हवामान अंदाजामूळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. पंजाब डख यांच्या हवामान अंदाज सेवेमुळे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची कामे  बदलत्या वातावरणामध्ये देखील करणे शक्य झाले आहे

बदलत्या हवामानाचा शेती आणि शेतकऱ्यांच्या वर खूप मोठा परिणाम होत आहे. पण तरीही बरेच शेतकरी या बेभरवशाच्या निसर्गावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी एका हवामान अंदाजकाच्या अंदाजावरून आपल्या शेतीशी नियोजन करत आहेत. हे हवामान अंदाज कोण योग्य ठरवत असेल तर ते पंजाब डखच आहेत. पंजाब डख हवामान अंदाज सेवेने महाराष्ट्रातील व भारतातील पारंपरिक व आधुनिक हवामान अंदाज सेवांना देखील मागे टाकून एक नवा इतिहास रचलेला आहे.

कोण आहेत पंजाब डख?

पंजाबराव डख यांचा प्रवास हा खूप खडतर होता. 2010 पूर्वी परभणी येथील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये अंशतः शिक्षकाचे काम करत होते. त्यानंतर 2008 पासून पूर्ण वेळ हवामान अंदाज या विषयावर काम करणे ठरवले. पंजाबराव ढग हे सध्याला पूर्ण वेळ हवामान अंदाज आहेत. त्यांचा हवामान अंदाज मानणारा महाराष्ट्र राज्यात खूप मोठा वर्ग आहे.

त्याचबरोबर सध्या ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये परभणी या लोकसभा मतदार संघामधून निवडणूक लढण्यास तयार आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे शेतकऱ्यांनीच त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये उभारण्यास सांगितलेले आहे.

महाराष्ट्र राज्यातील बरेच शेतकरी पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाज वर अवलंबून आहेत. महाराष्ट्रातील द्राक्ष, केळी, सोयाबीन, ऊस, आंबा, भाजीपाला पिके, मुग, उडीद, गहू, ज्वारी अशा बऱ्याचशा पिकांचा पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजा मुळे फायदा होतो. डख यांचा हवामान अंदाज बहुतांशी अचूकच असतो. त्यांच्या अंदाजामुळे गारपीट, वादळी पाऊस, सोसाट्याचा वारा तसेच पावसापासून होणारे नुकसान होत नाही. तसेच त्यांच्या हवामान अंदाजानुसारच शेतकरी त्यांच्या शेतीची कामे करतात. त्यामुळे त्यांचे शेतीचे नुकसान होणे टाळले जाते.

पंजाबराव डख यांचे हवामान अंदाज सांगण्याचे कौशल्य हे भारतीय हवामान विभाग IMD तसेच राज्याच्या हवामान अंदाज सेवेच्याही पुढे गेलेले आहेत. त्यांचा हवामान अंदाज जागतिक हवामान अंदाज याच्यात तुम्ही मध्ये देखील खूपच चांगला जमला जातो व त्यांचा अंदाज हा अधिक अचूक आहे. म्हणूनच महाराष्ट्रामधील बरेच शेतकरी त्यांच्या हवामान अंदाजानुसार आपल्या शेतीचे कामे करतात.

पंजाबराव डख हे लहान असताना नेहमी टीव्हीवर हवामान अंदाज पाहत असत. तसेच ते आपल्या वडिलांची व आजोबांशी हवामाना च्या बदलाबाबत नेहमीच चर्चा करत असत. त्यामुळेच त्यांना लहानपणापासूनच हवामानाविषयी एक आवड निर्माण झाली. मग त्यांनी हळूहळू हवामान बदलाबाबत त्यांची निरीक्षणे आपल्या वहीमध्ये नोंदवायला सुरुवात केली हवामानाची कशी परिस्थिती निर्माण झाल्या नंतर कसा पाऊस पडतो, याबद्दल त्यांनी सखोल अभ्यास केला.

वेळेनुसार त्यांना हवामानाबाबत संपूर्ण ज्ञान मिळाले व ते पूर्णपणे एक हवामान शास्त्रज्ञ बनले. यावेळीच पंजाबराव डख यांच्या असे लक्षात आले की महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना भारतीय वेधशाळेचा हवामान अंदाज समजतच नाही त्यामुळे त्यांनी अगदी सोप्या भाषेत व शेतकऱ्यांना समजेल असा हवामान अंदाज देण्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी आपल्या लहान मोबाईल वरून टेक्स्ट मेसेज वरून शेजारच्या शेतकऱ्यांना हवामान अंदाज पुरविण्यास सुरुवात केली. व आता ते आपल्या एका मोबाईल वरूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज पोहोचवतात. त्यांच्या हवामान अंदाज मध्ये फक्त पाऊस सांगितला जात नाही, तर त्याबरोबर वारे कोणत्या दिशेने आहे, पाऊस कुठे जास्त आहे, पाऊस कुठे कमी आहे, विजांची शक्यता किती आहे, वाऱ्याची दिशा व वेग किती आहे याबाबत संपूर्ण माहिती ते देत असतात.

नावपंजाब डख
प्रमुख कामहवामान अभ्यासक
गावगुगळीं धामणगाव, परभणी
जन्म19 एप्रिल 1984
कार्यक्षेत्रमहाराष्ट्र

पंजाब डख हवामान अंदाज

पंजाबराव डख हे सोशल मीडिया वरून जसे की व्हाट्सअप फेसबुक तसेच युट्युब वरून शेतकऱ्यांना हवामान अंदाज देतात.व्हाट्सअप वरून ते वेळोवेळी शेतकऱ्यांपर्यंत हवामान अंदाज पोहोचवतात. त्यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी अगदी मोफत आहे. पंजाबराव डख हे हवामान अंदाज सांगत असताना पुढील पंधरा दिवसांचा हवामान अंदाज देतात. ते शेतकऱ्यांना पुढील कामाचे पावसानुसार नियोजन सांगतात. त्यांच्या हवामान अंदाज मध्ये महाराष्ट्र मधील कोणत्या ठिकाणी पाऊस पडेल कोणत्या ठिकाणी वातावरण कसे असेल याबाबत संपूर्ण माहिती दिलेली असते. त्यांच्या हवामान अंदाजामध्ये पावसाची तीव्रता, वाऱ्याचा वेग, ढगांचे वातावरण, गारपीट, वादळी पाऊस, विजांचा धोका याबाबत संपूर्ण माहिती दिली जाते. ज्याचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होतो.

पंजाबराव डख यांच्या अचूक हवामान अंदाज मुळे महाराष्ट्र मधील शेतकरयांनी त्यांना आदराने शेतकऱ्यांचा शास्त्रज्ञ असे नाव दिलेले आहे. महाराष्ट्र मधील कानाकोपऱ्यामध्ये डक साहेबांना पुढील हवामान अंदाज सांगण्यासाठी त्यांना दूरदूर वरून आमंत्रित केले जाते. हे सर्व करत असताना पंजाबराव उद्योग हे एकही रुपया न घेता आपले कर्तव्य बजावतात. फक्त ते आयोजकाकडून जाण्या येण्याचा खर्च घेतात. पाऊस चांगला पडावा व वेळोवेळी पडावा यासाठी पंजाबराव डक यांनी प्रत्येक ठिकाणी झाडे लावावीत असे आवाहन केलेले आहे. आणि ती शेतकऱ्यांना वर्षांवर्षे झालेत आलेल्या पारंपारिक अशा निसर्ग ओळखण्याच्या हवामान अंदाज पद्धती शेतकऱ्यांपुढे उजागर करतात.

पंजाब डख यांनी संपूर्ण जगाला असे दाखवून दिले आहे की, आपल्याकडे कमी साधने असून सुद्धा नैसर्गिक खानाखुणांमुळे व हवामानाच्या अभ्यासामुळे कसा हवामान अंदाज लावता येऊ शकतो. व त्यांच्या या कुणाचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

पंजाबराव यांचे संपूर्ण जीवन हवामान अंदाज व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात समर्पित आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान अंदाज योग्यवेळी मिळावा यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. पंजाबराव हे हवामान अंदाज सोबत शेतीचे मार्गदर्शन ही करून शेतकऱ्यांना मोठी मदत करतात. महाराष्ट्रात मधील शेतकऱ्यांसाठी त्यांचे योगदान खूप अनमोल आहे व या योगदानाचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होत असलेला दिसून येत आहे.

पंजाबराव डख यांच्या अचूक हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांची खूप मोठी ओळख आहे. त्यांची लोकप्रियता आपण यावरूनच समजू शकतो की त्यांनी पाठवलेला हवामान अंदाज 24 तासांमध्ये तीन ते पाच कोटी लोकांपर्यंत पोहोचला जातो. महाराष्ट्र मधील जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांकडे व्हाट्सअप आहे. त्यामुळे पंजाबराव डख यांनी आपला हवामान अंदाज व्हाट्सअप वरून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम केलेलं आहे. व्हाट्सअप वर हवामान अंदाज पाठवल्यामुळे तो शेतकऱ्यांना लवकर पोहोचतो व स्थानिक भाषेत असल्यामुळे शेतकऱ्यांना हा हवामान अंदाज लगेच समजतो. आय एम डी किंवा हवामान विभागाच्या जटील शब्दशैलीमुळे शेतकऱ्यांना पारंपारिक हवामान अंदाज समजणे कठीण जाते. व पंजाबराव ढग यांच्या सोप्या शब्दशैलीत हवामान अंदाज सांगण्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हा आवाहन अंदाज समजला जातो. शेतकरी अक्षरशः पंजाबराव ढग यांचा हवामान अंदाज येण्याची वाट बघत असतात.

अशी झाली हवामान अंदाज देण्याची सुरुवात

पंजाबराव डख हे लहान असताना हवामान मध्ये खूप रूची ठेवत असत. लहानपणामध्ये टीव्ही पाहत असताना टीव्हीवर बातम्यांमध्ये हवामान अंदाज दाखवला जात असे. हवामान अंदाज यांना पहायला आवडत असे. हळूहळू ते न चुकता दररोज हवामान अंदाज टीव्हीवर पाहायला चालू केले. त्यामुळे त्यांची हवामान अंदाजाविषयी खूप मोठी रुची तयार झाली. तसेच ते लहान असताना त्यांच्या आजोबांसोबत वडिलांसोबत नेहमी हवामानाविषयी एक चर्चा करत असत. एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की त्यांचा जन्मच हा हवामान अंदाज ओळखण्यासाठीच झालेला आहे.

हवामान अंदाज टीव्हीवर पाहत असताना व निसर्ग मध्ये काय काय बदल होतो या दोन्हींचा अभ्यास करून त्यांनी वहीवर त्याच्या नोंदी घ्यायला सुरुवात केली. व असे करत करत ते त्यामध्ये पूर्ण पारंगत झाले. त्यांना हवामान अंदाज समजायला सुरुवात झाली. आपला हवामान अंदाज बरोबर येत आहे असे समजल्यानंतर त्यांनी शेजारच्या काही शेतकऱ्यांना आपला हवामान अंदाज टेक्स्ट मेसेज द्वारे त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यास सुरुवात केली.

त्यावेळेस पंजाबराव डख यांचा कापूस पंचक्रोशी मध्ये लोकप्रिय होता. त्यामुळे कापसाला पाहायला येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही मोठी होती. जे शेतकरी त्यांच्या शेताला भेट द्यायला येत असत त्या सर्व शेतकऱ्यांची पंजाबराव डक यांनी आपल्या वहीत नोंदणी करून त्यांचा मोबाईल नंबर ही घेतला. व त्या सर्व शेतकऱ्यांना हा आपला अंदाज पाठवण्यास सुरुवात केली. लवकरच हा अंदाज त्या सर्व शेतकऱ्यांना आवडायला लागला व मोठ्या प्रमाणामध्ये पुढे शेअर देखील व्हायला लागला. हळूहळू त्यांच्या हवामान अंदाज प्रचंड लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली.

पंजाब डख

पंजाबराव डख यांच्या यशाचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या हवामान अंदाज मधील अचूकता. त्यांचा अंदाज बरेच वर्षांच्या परिश्रमामुळे व अभ्यासामुळे अचूक होत गेला. पंजाब डक त्यांचा स्वतःचा हवामान अंदाज असून देखील हा हवामान अंदाज पारंपारिक हवामान अंदाज संस्थानच्या बरोबरीत येत आहे का हे देखील तपासतात. त्यांच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत आहे.

पंजाब डख यांचा मोबाईल नंबर

पंजाब डख यांचा मोबाईल नंबर महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील किमान 20 ते 25 शेतकऱ्यांनी कडे नक्की मिळेल. कारण बरेच शेतकरी यांना डायरेक्ट फोन करून हवामान अंदाज विचारत असतात.

जर आपल्याला पंजाबराव डख यांचा मोबाईल नंबर हवा असल्यास. पंजाबराव डख यांच्या व्हाट्सअप ग्रुप द्वारे हवामान अंदाज देतात त्या व्हाट्सअप ग्रुप चे एडमिन ते स्वतः आहेत. त्यांच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन तुम्ही त्यांचा नंबर मिळू शकतात. व्हाट्सअप ग्रुपची लिंक आमच्या वेबसाईट मध्ये उपलब्ध आहे. तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता.

पंजाबराव डख यांचे व्हाट्सअप ग्रुप

पंजाबराव डख हे युट्युब सोबतच मुख्यत्वे व्हाट्सअप वरून शेतकऱ्यांपर्यंत हवामान अंदाज पोहोचवतात. पंजाबराव डख यांच्याकडे सुरुवातीस जास्त प्रमाणामध्ये व्हाट्सअप वर शेतकरी नव्हते. पण ज्या वेळी जिओ या कंपनीने मोफत इंटरनेट सेवा सुरू केल्यानंतर, महाराष्ट्र मध्ये व्हाट्सअप वापरणारा वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. तसेच पंजाबराव उद्योग यांचेही व्हाट्सअप ग्रुप मोठ्या प्रमाणात वाढले.

2015 च्या सुमारास पंजाबराव डख यांचे फक्त व्हाट्सअप 25 ग्रुप होते. आजवर पंजाबराव डख यांची एक हजार पेक्षा जास्त ग्रुप आहेत व प्रत्येक ग्रुपमध्ये जवळजवळ एक हजार मेंबर आहेत. बघ साहेबांचे जिल्हा नुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र मधील व सीमावर्ती भागांमध्ये ग्रुप आहेत.

हवामान अंदाज ओळखण्याची नैसर्गिक चिन्हे

पंजाब डख हे कधी आणि किती पाऊस पडेल याची अचूक माहिती देणारे भरवशाचे हवामान अंदाजक आहेत, जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज सांगण्याचे साधन बनले आहेत.

ज्यांना पावसाची नैसर्गिक चिन्हे कशी ओळखायची हे जाणून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी पंजाब डख यांच्या नुसार काही उपयुक्त टिप्स त्यांनी दिलेल्या आहेत.

  • सूर्यास्त होताच आजूबाजूचे आकाश लाल होते. हे पाहिल्यास येत्या तीन दिवसांत पाऊस पडेल.
  • बल्ब वर किडे आणि कीटक पाखरे दिसू लागल्यावर पुढील तीन दिवसांत पाऊस पडेल.
  • याव्यतिरिक्त, मृग नक्षत्र 7 जून रोजी सुरू होते, त्या वेळी झाडावरच्या चिमण्या धुळीत आंघोळ करत असतील तर येत्या तीन दिवसांत पाऊस पडेल.
  • आकाशातून विमान गेल्याचा आवाज ऐकू आल्यास, पाण्याचे ढग वर असल्याने पुढील तीन दिवसांत पाऊस पडेल. कारण ज्या वेळेस हवेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता असेल त्यावेळी विमानाचा आवाज खालीपर्यंत येत असतो.
  • गावरान आंबा मोठ्या प्रमाणात पिकला नाही तर पाऊस पडेल.
  • जून महिन्यात सूर्य तपकिरी झाला तर पुढील चार दिवसांत पाऊस पडेल.
  • चिंचेचे प्रमाण जास्त असताना पाऊस सामान्यतः जास्त असतो.
  • सरड्यांनी डोक्यावर लाल रंग दाखवला तर येत्या चार दिवसांत पाऊस पडेल.
  • घोरपड्यांनी तोंड बाहेर काढून खड्ड्याबाहेर बसल्यास येत्या चार दिवसांत पाऊस पडेल.

पंजाब डख यांच्या नुसार जास्त झाडे म्हणजे जास्त पाऊस. कमी झाडे असलेल्या ठिकाणी पाऊस कमी पडतो.  जेव्हा कमी झाडे असतील तेव्हा तापमानात वाढ होईल, वादळे आणि काही ठिकाणी गारपीटही होईल. त्यामुळे अधिकाधिक झाडे लावणे गरजेचे आहे.

हवामानाचा अंदाज समजून घेऊन शेतकरी त्यांच्या शेतीविषयक कामांचे नियोजन करू शकतात आणि पावसामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. मान्सून पूर्वेकडून आल्याने गेल्या तीन वर्षांत पावसाचे प्रमाण वाढले आहे, परिणामी पाऊस अधिक झाला आहे.

पंजाब डख यांच्या या खुणांमुळे पावसाची चिन्हे ओळखून शेतकऱ्यांना हवामानाची तयारी करण्यास आणि त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते. पंजाब डख हे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे स्पष्ट, समजण्यास सोपे हवामान अंदाज प्रदान करतात, शेतकऱ्यांना पावसाचे नियोजन करण्यात आणि नुकसान टाळण्यास मदत करतात. जास्तीत जास्त झाडे लावून आपण चांगले वातावरण निर्माण करू शकतो आणि अधिक पावसाला प्रोत्साहन देऊ शकतो. हे त्यांचे ठाम मत आहे.

या हवामानाच्या अंदाजाने प्राप्त होणारे फायदे

पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाज यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठे फायदे झालेले आहेत.

पंजाब डख यांच्या अंदाजांमुळे शेतकऱ्यांना पिकांची पेरणी आणि कापणीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत झाली आहे, हवामानाचा अंदाज न येण्यामुळे होणारे नुकसान टाळले आहे. वृक्षारोपणाची गरज आणि पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण राखण्याच्या महत्त्वाची माहिती या सेवेने शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांसाठी त्याची मदत मोलाची आहे

पंजाबराव यांचा हवामान अंदाज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक मोठी क्रांती म्हणून उदयास आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अप्रत्याशित हवामान पद्धतींवर मात करण्यात आणि त्यांच्या शेतीच्या नियोजनाबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत झाली आहे. हवामानाच्या अधिकृत अंदाजांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, पंजाब डख यांचे यश हे दर्शवते की अचूक आणि सरळ साधा सोपा हवामान अंदाज शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो.

पंजाब डख यांनी कधीपासून हवामान अंदाज सांगण्यास सुरुवात केली?

पंजाब डख यांनी 2008 पासून हवामानाचा अंदाज सांगण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी ते परभणीतील एका प्रथिमिक शाळेत शिक्षकाचे काम करीत होते.

पंजाब डख हवामान अंदाजाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो?

पंजाब डख हवामान अंदाज अचूक तर आहेच, परंतु हा अंदाज अगदी सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला जातो. या अंदाजमुळे शेतकऱ्यांना हवामान बदलाची पूर्वसूचना मिळते आणि त्यानुसार शेतकरी कामाचे नियोजन करू शकतात

पंजाब डख हवामान अंदाज कसा मिळवावा?

पंजाब डख हवामान अंदाज वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला जातो, जसे की व्हॉट्सअँप, फेसबुक, यूट्यूब, वेबसाईट आणि हवामान ॲप. शेतकरी व्हॉट्सॲप ग्रूप मध्ये जॉईन होऊन हवामान अंदाज मिळवू शकतात

पंजाब डख यांचा हवामान अंदाज विश्वासार्ह आहे?

पंजाब डख हे एक अनुभवी हवामान अभ्यासक आहेत. त्यांचा हवामान अंदाज हा आधुनिक तंत्रज्ञान आणि जुन्या हवामान सुचके यांचा वापर करून दिला जातो. शेतकरी या अंदाजावर विश्वास ठेवून निर्णय घेऊ शकतात…