राज्यामध्ये पावसाचा मुक्काम अजून वाढला, 18 मे पर्यंत पडणार मान्सूनपूर्व पाऊस.

राज्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. या महिन्यांमधील आठ तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली. राज्यात प्रथमतः पूर्व विदर्भात आठ मेला पाऊस पडायला चालू झाला. त्यानंतर हळूहळू पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात पावसाने पडायला सुरुवात केली. त्यानंतर ११ मे पासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली होती. तर आता इथून पुढे पावसाचा अंदाज कसा असेल याबाबत होम अभ्यास पंजाब दख माहिती देत आहेत.

मागील आठवड्याचा हवामान अंदाज काय होता

मागील आठवड्यामध्ये आठ मे रोजी हवामान अंदाज दिलेला होता. या हवामान अंदाज मध्ये असे सांगण्यात आलेली होती की, राज्यामध्ये आठ मे पासून पावसाला सुरुवात होईल, सुरुवात पूर्व विदर्भापासून होऊन हळूहळू तो पाऊस पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व इतर महाराष्ट्र मध्ये पसरेल. तर यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाची योग्य त्याप्रमाणे काळजी घ्यावी असा अंदाज दिलेला होता. मागील आठवड्यामध्ये दिलेला हवामान अंदाजानुसारच तो पाऊस पडला व चांगल्या प्रकारे पावसाने महाराष्ट्रामध्ये हजेरी लावली.

या आठवड्याचा हवामान अंदाज.

या आठवड्यामधील हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पावसाचा मुक्काम हा वाढणार आहे. महाराष्ट्र मध्ये पाऊस हा 18 मे पर्यंत असणार आहे. विशेषतः हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडणार आहे. व हा पाऊस भाग बदलत पडणार आहे. सोबतच महाराष्ट्र मधील कोकण व उत्तर महाराष्ट्र मध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे.

बऱ्याचशा शेतकऱ्यांना पावसाचे फायदे तोटे

ज्या शेतकऱ्यांनी पिके काढणीस आलेली आहेत त्या शेतकऱ्यांना हा पाऊस नुकसानकारक ठरेल. जसे की कांदा व हळद पिकांच्या काढण्या मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र मध्ये चालू आहेत यांचे नुकसान होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करावा. तसेच पावसाळी शेतकऱ्यांनी घराबाहेर पडू नये. विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ऊस शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची कमतरता भासत होती. त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांना व ऊसाला जीवदान देण्याचे काम करेल. महाराष्ट्र मधील ऊस पट्ट्यात उसाची जवळपास दोन पाणी वाचतील एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जिल्हा नुसार हवामान अंदाज

राज्यामधील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता. तसेच नगर नाशिक अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ही चांगला पाऊस पडेल. तसेच जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांमध्येही अजून काही दिवस पावसाची शक्यता आहे.

मान्सूनचे आगमन

भारतामध्ये सर्वात आधी मान्सून हा अंदमान व निकोबार या ठिकाणी येत असतो. येणाऱ्या काही दिवसात म्हणजेच 22 मे ला मानसून अंदमान व निकोबार बेटांवर धडकण्याचा अंदाज आहे. व त्यानंतर ८ जूनला हा मान्सून महाराष्ट्र मध्ये पोहोचेल.

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणी योग्य पाऊस होईल, असा अंदाज आहे.

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,14/05/2024

Leave a Comment