राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाला आता ब्रेक मिळणार आहे. फक्त काही जिल्हे सोडता, राज्यामध्ये पाऊस हा थांबणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी खूप मोठा अवकाळी पाऊस पहायला मिळत होता.
नवीन हवामान अंदाज
राज्यामध्ये आजपासून म्हणजेच 19 मे पासून काही जिल्हे वगळता पाऊस थांबणार आहे. व तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. राज्यांमधील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र मध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे.
पण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस अजूनही असणार आहे. जसे की सांगली सोलापूर सातारा पुणे व काही प्रमाणात कोल्हापूर मधील तालुके या ठिकाणी अजूनही अवकाळी पाऊस हा पडू शकतो. 24 मे पर्यंत या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पण हा पाऊस ठीक ठिकाणी व तुरळक ठिकाणी पडणार आहे.
व कोकणामधील जिल्ह्यांमध्येही काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील काही ठिकाणी पावसाचे वातावरण असणार आहे व उर्वरित राज्यात उन्हाचा कडाक्याचा सामना करावा लागणार आहे.
सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, राज्या देशा त लवकरच मान्सूनचे आगमनहोणार आहे.
नवीन चक्रीवादळाचा परिणाम
22 व 23 मे च्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन चक्रीवादळ तयार होणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्र मध्ये फारसा होणार नाही. हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामधून हळूहळू पश्चिम बंगाल व बांगलादेश कडे जाणार आहे त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रावर फारसा होणार नाही. तरीही काही प्रमाणात 28 मे च्या दरम्यान महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण व तुरळक पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील कामे 28 मे आधी पूर्ण करून घ्यावी. राज्यात शेतकऱ्यां कडून मका काढणे व भुईमूग काढणे बऱ्याच ठिकाणी चालू आहे. त्यांनी आज पासून पुढील आठ दिवसांमध्ये आपल्या शेतीतील कामे पूर्णपणे करून घ्यावीत.
दोन दिवसात मान्सून देशात येणार
देशामधील एकंदरीत हवामानाची परिस्थिती बघितल्यास, राज्यामध्ये पुढील दोन दिवसात मान्सून आपल्या देशामध्ये पदार्पण करणार आहे. सर्वात पहिला मानसून हा दरवर्षी अंदमान व निकोबार या ठिकाणी येत असतो यावर्षीही मान्सून अंदमान व निकोबार बेटांमध्ये 22 मे रोजी पदार्पण करणार आहे. त्यानंतर लगेच म्हणजेच पुढील आठच दिवसांमध्ये मान्सून केरळ मध्ये पोहोचणार आहे.
अशाप्रकारे मान्सून अंदमान निकोबार व केरळमध्ये पोहोचल्यानंतर पुढील पाच-सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पदार्पण करेल. म्हणजेच ७ ते ८ तारखेला महाराष्ट्र मध्ये मान्सून येईल. व पेरणी योग्य पाऊस महाराष्ट्र मध्ये पडण्यासाठी जवळजवळ 22 जून इतका वेळ लागणार आहे.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,19/05/2024