मागील काही दिवसांपासून देशातील हवामान हे पावसासाठी सक्रिय होत आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांमध्ये चांगल्या प्रकारे पावसाने हजेरी नोंदवली. पंजाब यांनी सांगितल्याप्रमाणे मागील हवामान अंदाजानुसार सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी चांगला पाऊस झाला. विदर्भ हो मराठमोळ्यांमध्येही काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झालेला होता.
आजच्या हवामानामध्ये मान्सूनची पुढील वाटचाल व महाराष्ट्रात पडणारा मान्सून पूर्व पाऊस याबाबत पंजाब डख यांनी सांगितले आहे.
मान्सून बाबत अपडेट
22 मे ला मानसून ने अंदमान निकोबार बेटांवर हजेरी लावली. त्यानंतर मान्सून ने दक्षिण बंगाल उपसागर व श्रीलंका व दक्षिण अरबी समुद्रामध्ये हजेरी लावलेली आहे. पंजाब डख यांच्या अंदाजानुसार एक जूनला मान्सून केरळमध्ये पोहोचेल व चांगल्या प्रकारे प्रगती करत आठ जूनला मान्सून महाराष्ट्रामध्ये हजेरी लावेल असे पंजाब डख यांनी आपल्या हवामान अंदाज मध्ये सांगितलेली आहे.
काय आहे नवीन हवामान अंदाज
पंजाब डख हवामान अंदाज
आज 24 व 25 मे ला महाराष्ट्र मधील पश्चिम महाराष्ट्र मध्ये चांगल्या प्रकारे पाऊस हजेरी लावेल. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व कोकणामधील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
यानंतर १ जून पासून ३ जून पर्यंत महाराष्ट्र मध्ये मान्सून पूर्व पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मशागतीची कामे याआधी उरकून घ्यावीत.
जवळपास आज पासून पंधरा दिवसांनी मान्सून महाराष्ट्रामध्ये हजेरी लावेल.
🔴सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मान्सून व पावसामुळे जमिनीमध्ये किमान एक वीत खोल जमिनीमध्ये ओल झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा.
सध्या बंगालच्या उपसागरामध्ये चालू असलेल्या वादळामुळे काही प्रमाणात मान्सूनचे बाष्प हे वादळ खेचत आहे. यामुळे काही प्रमाणात मान्सून स्थिर झालेला आहे. पण पुढील वातावरण पाहिल्यास मान्सूनसाठी खूप चांगले वातावरण दिसून येत आहे.
सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणी योग्य पाऊस होईल, असा अंदाज आहे.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,24/05/2024