आगामी आठवड्याचे हवामान व पावसाची परिस्थिती : पंजाब डख

राज्यातील सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 21 जुलै ते 30 जुलै दरम्यानचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 21 जुलैपासून रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे आणि पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण राज्यात सूर्यदर्शन होण्याची शक्यता कमी आहे.

ढगाळ वातावरण किती दिवस असणार

राज्यातील बहुतांशी भागात 21 जुलैपासून रिमझिम पाऊस होणार असल्याने, पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज. अनेक भागात सूर्यदर्शन होणार नाही. त्यामुळे 24 जुलैपर्यंत राज्यात सूर्य दर्शन होण्याची शक्यता कमी आहे. (Panjab Dakh Havaman Andaj July 21,30)

24 जुलैपासून अधिक पावसाची शक्यता

राज्यामध्ये 24 जुलैपासून हवामान आणखी पावसासाठी अनुकूल होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल. 30 जुलैपर्यंत राज्यात पावसाची सलग परीस्थिती राहणार आहे, ज्यामुळे संपूर्ण जुलै महिना पावसाळी राहील असे पंजाब डक यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना सूचित केले आहे की, 21 जुलैपासून रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांची फवारणी करणे टाळावे. पावसाची उघड पडल्यास फवारणीसाठी स्टिकर वापरावा. ढगाळ वातावरणामुळे बुरशीचा, व किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे कीटकनाशकासोबतश बुरशीनाशकाचा वापर करावा.

राज्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता

21 ते 30 जुलै दरम्यान राज्यातील सर्व भागात दोन दोन दिवसांचा मुक्काम घेत पाऊस पडणार आहे. काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे, तर काही जिल्ह्यात अद्याप कमी पाऊस आहे. तसेच पुढील काही दिवस हवामान अनुकूल असल्यामुळे  या काळात राज्यात सर्वदूर पावसाची स्थिती राहील.

फवारणीचे व्यवस्थापन

आज पासून 30 जुलै पर्यंत पाऊस राहणार असून राज्यातील ज्या भागात पावसाची उघड मिळेल अश्या शेतकऱ्यांनी स्टिकर वापरून फवारणी करून घ्यावी, पण पावसाच्या परिस्थितीमध्ये फवारणी करू नये. कारण ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन आणि कापूस पिकात तुडतुडे, मावा, पांढरी माशी आणि अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी पोषक वातावरण आहे.

या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा

पंजाबराव डख यांनी राज्यातील कोकण भागात तसेच विदर्भातील चंद्रपूर,गडचिरोली , गोंदिया, भंडारा जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता असून अशा परिस्थितीत गरज नसताना घराच्या बाहेर जाणे टाळावे.

पंजाब डख हवामान अंदाज

आगामी आठवड्यात पावसाळी परीस्थिती राहील. शेतकऱ्यांनी हवामानाची स्थिती पाहून पिकांची काळजी घ्यावी आणि पिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत. पंजाबराव डख यांचा अंदाज राज्यामधील शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. यांच्या अंदाजानुसार, शेतकऱ्यांनी पिकांची फवारणी योग्य वेळी करावी आणि हवामानाच्या स्थितीनुसार आपल्या शेतीचे व्यवस्थापन करावे. तसेच, सतर्क राहून पूर परिस्थितीची काळजी घ्यावी.

Leave a Comment