पंजाब डख हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप हा पंजाब डख यांचा हवामान अंदाज देण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. पंजाब डख हे ज्यावेळी इंटरनेट व अँड्रॉइड फोनची सेवन नव्हती त्यावेळेस एसएमएस द्वारे हवामान अंदाज देत असतात. पण कालांतराने इंटरनेट कनेक्शन व अँड्रॉइड फोन ज्यावेळेस बाजारामध्ये उपलब्ध झाले त्यावेळी पंजाब डख यांनी व्हाट्सअप वर नवीन ग्रुप काढून त्यावर हवामान अंदाज देण्याची सुरुवात केली.
विषयसूची
2013 पासून व्हाट्सअप ग्रुप बनवण्यास सुरुवात केली
पंजाबराव डख यांनी 2013 पासून व्हाट्सअप ग्रुप वरून हवामान अंदाज देण्यास सुरुवात केली. पण त्याआधी त्यांना शेतकऱ्यांना हवामान अंदाज देणे खूप अवघड झाली होते. कारण प्रत्येक व्यक्तीला वेगळा एसएमएस त्यांना मोबाईल वरून करावा लागत असे, व प्रत्येक एसएमएस साठी त्यांचे एक रुपये खर्च होत होते. महिन्यासाठी जवळजवळ दोन हजार रुपयांचा खर्च त्यांना फक्त मोबाईलवर एसएमएस पाठवून होत असे. पण ज्यावेळी पासून व्हाट्सअप वर त्यांनी sms करण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्यांचा खर्च हा खूप कमी झाला. पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp group आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे.
पंजाबराव डख यांनी 2013 मध्ये ज्यावेळी व्हाट्सअप आले त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र मधील 35 जिल्ह्यांचे 35 व्हाट्सअप ग्रुप तयार केले. व ज्यावेळी हवामान बदल होत असे त्यावेळी ते प्रत्येक जिल्ह्यांचे वेगवेगळ्या हवामान अंदाज देऊन ज्या त्या जिल्ह्याच्या व्हाट्सअप ग्रुप वर ते हवामान अंदाज पाठवत असत. तसेच त्यांनी महाराष्ट्र मधील विभागानुसार हवामान अंदाज देण्यास देखील सुरुवात केली. जसे की विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र अशा विभागांमधून जसे हवामान होत आहे त्या पद्धतीने तेथील शेतकऱ्यांना व्हाट्सअप ग्रुप वर हवामान अंदाज दिला जात होता.
पंजाब डख यांचे किती व्हाट्सअप ग्रुप आहेत
पंजाब डख यांना त्यावेळी व्हाट्सअप वर देखील एका ग्रुप मध्ये फक्त 124 मेंबर घेता येत होते, यामुळे त्यांना फक्त दोन वर्षातच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये 800 ग्रुप करावे लागले. पण व्हाट्सअप अपडेट झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक ग्रुपमध्ये हळूहळू जास्त मेंबर घेण्यास सुरुवात केली. अपडेट टप्प्याटप्प्याने होत होता एकावेळी 240 त्यानंतर 540 व आता १०२४ मेंबर व्हाट्सअप च्या एका ग्रुप मध्ये असतात. याचा खूप मोठा फायदा पंजाब डख यांना झाला.
पण शेतकऱ्यांचा इतका मोठा प्रतिसाद होता की पंजाबराव डक यांचे खूप जास्त व्हाट्सअप ग्रुप झाले. त्यांचे रोज पाच ते दहा व्हाट्सअप ग्रुप भरत असत. यामुळे त्यांचे जवळजवळ बाराशे व्हाट्सअप ग्रुप झाले. हे व्हाट्सअप ग्रुप त्यांना एका मोबाईल मध्ये ठेवणे खूप अवघड झाले. त्यामुळे त्यांनी चांगल्या मेमरीचा आयफोन मध्ये व्हाट्सअप घातल्यानंतर त्यांचा मोबाईल व्यवस्थित चालू लागला.
चार कोटी लोकांपर्यंत पोहोचतो मेसेज
पंजाब डक यांचे १२०० व्हाट्सअप ग्रुप आहेत. या व्हाट्सअप ग्रुप मध्ये दहा लाखांपेक्षा जास्त मेंबर आहेत. त्यांनी हवामान अंदाज हा मेसेज टाकल्या टाकल्या काही क्षणातच तो दहा लाख लोकांपर्यंत पोहोचतो. व त्यांचे स्वतःचे युट्युब चॅनेल आहे . तसेच पंजाब डक यांनी हवामान अंदाज दिल्या दिल्या लगेच त्याची न्यूज बनते व महाराष्ट्रात जवळ जवळ चार कोटी लोकांपर्यंत त्यांचा मेसेज फक्त बारा तासांमध्ये पोहोचतो.
पंजाब डख हवामान अंदाज whatsapp group
आम्ही पंजाब डख यांचा व्हाट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक देत आहोत. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.
व त्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ज्यावेळी तुमच्या जिल्ह्याच्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक येईल त्यावेळी तुम्ही त्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.