राज्यात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात- पंजाब डख हवामान अंदाज

राज्यामध्ये आठ मे पासून पावसाला सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात पश्चिम विदर्भ पासून व पूर्व विदर्भ पासून चालू झालेली आहे. नऊ मी ला राज्यामध्ये मराठवाड्यामधील जालना, संभाजीनगर, परभणी व अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला.

काय होता मागील हवामान अंदाज

3 मे रोजी दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यांमध्ये सात मे पर्यंत कडाक्याच्या उन्हासह अति तापमानाचा अंदाज दिलेला होता. तसेच 8 मे पासून राज्यामध्ये विदर्भापासून पावसाला सुरुवात होईल असा हवामान अंदाज 3 मे रोजी दिलेला होता. या पावसामध्ये राज्यातील तुरळ ठिकाणी गारपीटीचा अंदाज ही दिलेला होता. व बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज दिलेला होता.

या अंदाजानुसार राज्यांमध्ये 8 मे ला पावसाची सुरुवात झालेली आहे. व महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी गारपीट व जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळली आहेत तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेली आहे. पण हवामान अंदाज आधी दिल्यामुळे 90% शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचलेले आहे.

नवीन हवामान अंदाज

नवीन हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पावसाचा मुक्काम हा वाढणार आहे. जवळजवळ आठ मे पासून सुरू झालेला पाऊस 16 मे पर्यंत महाराष्ट्रात राहणार आहे. यावेळी हा पाऊस महाराष्ट्र मध्ये भाग बदलत बदलत पडणार आहे.

येणाऱ्या हवामान अंदाजानुसार राज्यांमध्ये 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. भागांनुसार पहायचे असेल तर राज्यामध्ये 11 मे पासून पंधरा मे पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी हळद व कांद्याची काळजी घ्यावी. व द्राक्ष बागेची ही काळजी घेण्यात यावी. तसेच हा पाऊस कोकणात ही असल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आंब्याची काळजी घ्यावी.

हा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्येही पडणार आहे. यामध्ये जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, संभाजीनगर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्येही पाऊस पडणार आहे. हा पाऊस मोठा असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची काळजी घ्यावी. विशेषतः येथील शेतकऱ्यांनी केळी, कांदा, द्राक्ष या पिकांची काळजी घ्यावी.

राज्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ व कोकणामध्येही पडणार आहे यामुळे येथील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. विशेषतः या पावसामध्ये विजांचे प्रमाण जास्त असणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी पावसाच्या वातावरणामध्ये घराबाहेर पडणे टाळावे.

या पावसामुळे फायदा व नुकसान दोन्ही होणार

हा पाऊस वीट भट्टी मालकांसाठी नुकसान कारक व ऊस बागायतदारांसाठी चांगला ठरणार आहे, या पावसाचा त्यांना फायदा होईल. व हळद तसेच कांदा शेतकऱ्यांसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरणार आहे. नवीन पिकांच्या उन्हाळी लागवडीसाठी हा पाऊस शेतकऱ्यांसाठी आशादायक आहे.

या तारखेला मान्सून महाराष्ट्रात येणार

भारतामध्ये मान्सूनचे आगमन 22 मे रोजी अंदमान निकोबार या बेटांवर होणार आहे. व याचवेळी मान्सून भारतामध्ये पोहोचेल. व तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मान्सून पोहोचण्यासाठी जवळजवळ वीस दिवसांचा कालावधी लागतो, यामुळे महाराष्ट्रामध्ये मान्सून नऊ ते दहा जून दरम्यान पोहोचेल.

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणी योग्य पाऊस होईल, असा अंदाज आहे.

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,10/05/2024

Leave a Comment