पंजाब डख पावसाची चिन्हे कशी ओळखतात.

पंजाब डख हे नैसर्गिक हवामानाच्या चिन्हांचा अभ्यास करून अचूक हवामान अंदाज देणारी एकमेव व्यक्ती आहे. पंजाब डख यांच्याद्वारे शेतकऱ्यांना व महाराष्ट्रातील इतर लोकांना त्यांच्या हवामान अंदाजाचा मोठा फायदा होतो. आज आपण पंजाब डक हे आपल्याला कोणत्या पद्धतीने व कशाच्या अभ्यासावरून हवामान अंदाज सांगतात याबाबत माहिती पाहणार आहोत.

पंजाब डख हे लहान असताना ते हवामानाच्या चिन्हांचा अभ्यास करत असत. व त्यांना हवामानामध्ये रस होता. ज्यावेळी पाऊस पडला त्यावेळी वातावरण कसे असते व पाऊस पडण्याआधी वातावरण कसे होते याचा त्यांनी भरपूर अभ्यास केला. ते लहान असताना टीव्हीवर हवामानाचा अंदाज पाहत असत, व ज्यावेळी पाऊस सांगितला जातो त्यावेळी वातावरणामध्ये कसा बदल होतो याचा ते अभ्यास करत असत.

हळूहळू त्यांनी नैसर्गिक अभ्यासासोबत कॉम्प्युटर नकाशे पाहायला सुरुवात केली, व त्यांचा अभ्यास करून अचूक हवामान अंदाज कसा देता येईल याबाबत अभ्यास केला. आज त्यांच्या हवामान अंदाजाची अचूकता व लोकप्रियतेची सर्व ठिकाणी चर्चा आहे.

पंजाब डख यांची पाऊस येण्याची नैसर्गिक चिन्हे

  • सूर्यास्त होताच आजूबाजूचे आकाश लाल झाल्यास: येत्या तीन दिवसांत पाऊस पडेल.
  • बल्बवर किडे आणि कळ्या दिसू लागल्यावर: पुढील तीन दिवसांत पाऊस पडेल.
  • मृग नक्षत्र 7 जून रोजी सुरू होते आणि त्या वेळी झाडावरच्या चिमण्या धुळीत आंघोळ करत असतील तर: येत्या तीन दिवसांत पाऊस पडेल.
  • आकाशातून विमान गेल्याचा आवाज ऐकू आल्यास: पाण्याचे ढग वर असल्याने पुढील तीन दिवसांत पाऊस पडेल.
  • गावरान आंबा मोठ्या प्रमाणात पिकला नाही तर: पाऊस पडेल.
  • जून महिन्यात सूर्य तपकिरी झाला तर: पुढील चार दिवसांत पाऊस पडेल.
  • चिंचेचे प्रमाण जास्त असताना: पाऊस सामान्यतः जास्त असतो.
  • सरड्यांनी डोक्यावर लाल रंग दाखवला तर: येत्या चार दिवसांत पाऊस पडेल.
  • घोरपड्यांनी तोंड बाहेर काढून खड्ड्याबाहेर बसल्यास: येत्या चार दिवसांत पाऊस पडेल.

वरील प्रमाणे या प्रकारची नैसर्गिक चिन्हे निसर्गामध्ये दिसून आल्यास त्याचा वातावरणामध्ये व पावसावर परिणाम होतो. व त्याप्रमाणे पाऊस पडतो. पंजाब डक यांनी या नैसर्गिक चिन्हांवर मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करून ही चिन्हे जनते समोर मांडली आहेत.

पंजाब डख हवामान अंदाज

पंजाब डख यांच्या मते त्यांचा हवामान अंदाज जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल तर त्यांनी या चिन्हांचा वापर करून हवामानाचा अंदाज ओळखावा. व पंजाब डख चांगला पाऊस पडण्यासाठी जास्त झाडे लावण्याचे आवाहन करतात यामुळे पावसाची स्थिती सुधारेल असा त्यांचा अंदाज आहे.

यासोबतच पंजाब डक हे स्वतः नैसर्गिक निरीक्षणे व कॉम्प्युटर नकाशा पाहून हवामानाचा अंदाज दर आठवड्याला देत असतात, याचा संपूर्ण महाराष्ट्राला उपयोग होतो. विशेषतः शेतकरी वर्गाला या हवामानाचा मोठा फायदा होत असल्याचे दिसून येते.

Leave a Comment